Login

Register

Login

Register

kamdhanu gadhul gangapur

Play Video

गांडुळ खाद्य

चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, ऊसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीय खत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते.त्याच प्रमाणे घरातील कचरा, सांडपाणी, तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुद्धा वापरता येतो .

गांडुळखताचे फायदे

जमिनीचा पोत सुधारतो.

 1. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
 2. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
 3. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
 4. जमिनीची धूप कमी होते.
 5. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
 6. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
 7. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
 8. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
 9. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
 10. ओला कचरा व्यावास्तापन पण होते
 11. मातीचा कस टिकून राहतो
 12. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.

Contacts Us

सतीश   8275921694

आदित्य   8600870310

Address :

भेटा: सतीश राजाराम काळे, गंगापूर, ता. राहुरी, जि. अहमदनगर

 

Trusted by the best

Facebook Comments
0.00 avg. rating (0% score) - 0 votes
 • Sign up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.
We do not share your personal details with anyone.