Login

Register

Login

Register

भाग्यतारा पेरू रोप नर्सरी

आमच्याकडे लखनौ ४९ जातीची पेरूची खात्रीशीर रोपे मिळतील.

बोठे वस्ती , राहाता तहसील कार्यालयासमोर राहाता जि.अ.नगर’

साैरभ  प्रमोद बोठे
8888676766

पेरूची रोपे फक्त भाग्यतारा नर्सरी मधूनच घ्या...

पेरू विषयी थोडक्यात माहिती

पेरु
पेरु किंवा इंग्रजीला ग्वावा हे नाव मूळ स्पॅनिश नाव ग्वायाबा नावावरुन पडले आहे. जगभरात पेरुच्या एकूण शंभर वेगवेगळ्या जाती आहेत. पेरु मध्ये असणारया व्हिटॅमीन ए, बी, सी च्या साठयामुळे त्याला ‘सुपर फ्रूट’ म्हटले जाते. कच्चा आणि शिजवून पेरु वापरात आणला जातो. पेरु पासून लोणच, जॅम, जेली, मारमालेड्स आणि ज्यूस तयार केले जातात.

The Perfect Surrounding

पेरू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा
होणारी, मध्यम ते हलक्‍या प्रतीची जमीन चांगली असते. लागवडीसाठी सरदार ही जात निवडावी. लागवडीसाठी ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. चांगली माती, शेणखत आणि १ किलो सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरावेत. खड्ड्याच्या मध्यभागी कलमाची लागवड करून त्याला काठीचा आधार द्यावा. कलमांना पुरेसे पाणी द्यावे. आळ्यात आच्छादन करावे.

उत्पादन आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने पेरू झाडाची छाटणी, आकार देणे, वळण देणे इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. काही वेळा झाडे फार वाढून त्यांची दाटी झालेली असते. अशा झाडांची बहरापूर्वी छाटणी करून प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न येऊ शकते, तसेच बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग-कीडदेखील कमी येते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्या छाटणेदेखील महत्त्वाचे आहे.

पेरू विकिपीडिया

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे.खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास “जाम’ किंवा “अमरूद’ असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर “क’ जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या “व्हायरस’पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील “क’ जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.पेरू पासून आईसक्रिमही बनवले जाते.

The Best Experience Ever

खात्रीशीर लखनौ ४९ जातीच्या रोपांसाठी संपर्क करा.
सौरभ प्रमोद बोठे
मालक
Facebook Comments
5.00 avg. rating (98% score) - 4 votes
  • Sign up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.
We do not share your personal details with anyone.