Login

Register

Login

Register

श्रीरामपुर एक्सप्रेस-झहीर खान

 महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुका कृषीकारण व राजकारणामुळे ओळखला जाणारा तालुका.ह्याच श्रीरामपुरमधुन एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये खेळेल अस कुणालाही वाटत नव्हत परंतु झहिर खानच्या रुपाने एक हे स्वप्नवत वाटणारे प्रत्यक्षात साकार झाले.

        झहीर खान हा मध्यम वर्गीय कुटुंबातीलआहे. त्याच्या वडिलांचे नाव बख्ख्तीयार खान असे असून ते फोटो ग्राफर आहेत. त्याच्या आईचे नाव झकिया खान असून त्या शिक्षिका आहेत. झहीर खानला दोन भावंड आहेत.झहीर खान याचे नाव पाकिस्तानचा क्रिकेटपटू झहीर अब्बास यांच्या नावावरून ठेवण्यात आले. त्याचे टोपण नाव जॅक असे आहे. तो कपिलदेव नंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.झहीरच्या क्रिकेट श्रेत्रातील कारकिर्दीस २००० साली सुरुवात झाली. जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेला तेव्हा तेथे क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरु केले.त्यानंतर तो मुंबई,वडोदरा राष्ट्रीय संघाकडून खेळला व तेथुनच त्याला केनिया विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.त्या सामन्यात केनिया सामना जिंकतो का काय..? अश्या परिस्थितीत असताना झहिर खानने यार्कर हे गोलदांजीचे शेपनअस्र वापरुन सामना भारताच्या बाजुला फिरवला.
     भारतीय गोलंदाज यार्कर हा गोलंदाजीच्या प्रकाराचा वापर करत नसत.परंतु झहीर खानने यार्करचा पुरेपुर वापर करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.म्हणतात भारतीय क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांच स्मशान असत व इथल्या खेळपट्ट्या त्यांच्यासाठी चिता असतात.जिथे वेगवान गोलंदाज होण हा मुर्खपणा आहे तिकडे कपिलदेव ४०० आणि झहिर खान ३०० बळी ओलंडतात म्हणजे ही मर्त्य माणसे नाहीत.
     ऑस्ट्रेलिया असो इंग्लंड असो कि दक्षिण आफ्रिका, झहीरखानने कधीच निराश केलं नाही. किंबहुना हातात बॉल घेऊन धावत यायला लागल्यावर आता हा काही करू शकेल असे वाटणारा झहीर खान हा एकमेव गोलंदाज होता.
     झहीर खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक फलंदाजांचे त्रिफळे उडविणारा भारताचा गोलंदाज झहीर खानने २०१५ साली निवृत्ती घेतली आहे.  जहीर ने  आतापर्यंत ९२ कसोटी, २०० एकदिवसीय आणि १७ टी – २० सामने खेळले आहेत. ६१० विकेट्स त्याच्या खात्यात जमा आहेत.
 
मध्यम वर्गीय कुटूंबात जन्मलेला जहीर हा कठोर परिश्रमाच्या जोरावर भारताचा वेगवान गोलंदाज बनला. त्याने करिअरची सुरवात मुंबईकडून रणजी सामणे खेळण्याने केली. रणजी सामन्यात त्याच्या भेदक आणि डावखुऱ्या माऱ्याने सर्वांनाच भुरळ घातली. चेंडू नवा असो किंवा जूना त्याला काही फरक पडत नसे. त्याची चेंडू स्विंग करण्याची स्टाईलच आशी होती की, त्यामुळे फलंदाजांची भबेरी उडायची. कपिलदेव नंतरचा सर्वात यशस्वी गोलंदाज अशी त्याची खास ओळख होती. कसोटी क्रिकेटमध्ये ११ व्या क्रमांकावर येऊनही सर्वाधीक धावा काढणारा फलंदाज अशीही त्याची वेगळी ओळख आहे. गेल्या काही वर्षांपासून दुखापतीने ग्रासल्यामुळे व योग्य फिटनेस नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते. झहीरने २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला असून शेवटचा एकदिवसीय सामना तो २०१२ श्रीलंकाविरुद्ध खेळला होता. २०१७ साली तो अभिनेत्री सागरिका घाटके सोबत विवाहबद्ध झाला.
   श्रीरामपूरचा हा मराठी मुलगा विशेष कशाचा पाठींबा नसताना क्रिकेटमध्ये आला. भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, मैदाने आणि क्षेत्ररक्षण यांच्या उदासीनतेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशेहून अधिक बळी मिळवून गेला.

गणेश प्रमोद कुंभकर्ण पत्रकार,क्रिडा लेखक कोल्हार बु. मो.क्र-७७७४९५१९९४
गणेश प्रमोद कुंभकर्ण
पत्रकार
999
वेळा हा लेख वाचला गेला..
Facebook Comments
4.80 avg. rating (95% score) - 5 votes