Login

Register

Login

Register

राहाता तालुक्याचा पर्यटन विकास होणे गरजेचे…

लेखक परिचय :-

लेखक हे शिवचरित्र अभ्यासक व दुर्ग अभ्यासक आहे शिवचरित्र , शिव इतिहास ,गड किल्ले यावर वर्तमानपत्र ,साप्ताहिक, मासिकातून सातत्याने लेखन करीत असून एस 9 न्युज टीव्ही चैनल व दैनिक लोकमंथन चे पत्रकार आहेत त्याचप्रमाणे सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेचे अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत व महाराष्ट्र पत्रकार संघ  या संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख असून शिवचरित्र व्याख्याते आहेत  त्याचप्रमाणे इतिहास विषयात एम .ए केले असून एम . फिल करत आहे 

संपर्क :9011890279

  

नगर जिल्ह्याला धार्मिक,राजकीय,ऐतिहासिक अशी अनोखी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तूबरोबरच धार्मिक व नेसर्गिक स्थळे देखील मोठ्या प्रमाणात आहे.  नगर जिल्ह्यातील राहाता तालुका हा पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. राहता तालुक्यात राष्ट्रीय पर्यटकांबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात  परंतु हा तालुका पर्यटन विकासापासून वंचित आहे.

     राहता ही प्राचीन बाजारपेठ व तालुक्याचे ठिकाण व शिर्डीसारख्या देवस्थानापासून अगदी जवळ आहे.गावात ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराजांचे मंदिर आहे. मंदिर भव्य-दिव्य असून सभामंडप ही प्रशस्त आहे.

     त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डीपासून ५ कि.मी अंतरावर साकुरी हे गाव आहे.या गावात साईबाबांचे समकालीन संत श्री उपासनी महाराजांची कर्मभूमी असून समाधी स्थळ आहे व गावात याच बरोबर कन्याकुमारी मंदिर, शेवगा गणपती ही देखील धार्मिक स्थळ आहेत. राहता तालुक्यात याचबरोबर साडेतीन शक्तिपीठांचे एकत्रित स्थळ असलेले कोल्हार भगवतीपूर हे देखील तीर्थक्षेत्रआहे. पर्यटक, भाविक, देवीचे भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात. येथे वर्षातून दोनदा यात्रा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भाविक भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय देखील येथे आहे, परंतु शासनाने या मंदिर परिसराचा विकास करणे गरजेचे आहे.

     अशी धार्मिक पार्श्वभूमी या तालुक्याला आहे तशी ऐतिहासिकपार्श्वभूमी आहे. १७९५ साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी निमगाव (निघोज) येथे मंदिर वास्तू श्री मार्तंड चरणी अर्पण केली. त्याचप्रमाणे निमगाव-निघोज हे सरकार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या जहागीरीचा ऐतिहासिक वाडा आहे.

     तसेच वाकडी या गावी देखील खंडोबाचे जागृत देवस्थान आहे अ वाकडी गावातील खंडोबा मंदिरला जेजुरी इतकेच महत्त्व आहे व या ठिकाणी दूरदर्शनवरील एका मालिकेचे चित्रीकरण देखील पार पडले आहे.

    तालुक्यातील पुणतांबा हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. पुणतांबा येथे चांगदेव महाराज मंदिर आहे व २३८ वर्ष जुने कार्तिक स्वामींचे पुरातन भव्य मंदिर आहे.

    याचबरोबर तालुक्यात दहेगावची श्री रेणुकामाता मंदिर पिंपळवाडीचे श्री कानिफनाथ मंदिर रुईची प्रती शिर्डी दाढचे मुकुंददास मंदिर अशा स्वरुपाची विविध तीर्थक्षेत्र, धार्मिक क्षेत्रांनी समृद्ध राहता राहता तालुका आहे.

     उत्तर नगर व दक्षिण नगर यांना जोडणारा दुवा व १३ तीर्थक्षेत्र असणारा राहता तालुका होय. या तालुक्यात शिर्डी देवस्थानमुळे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय  पर्यटक येतात.

     जर या पर्यटकांना शिर्डीबरोबरच इतर १३ धार्मिक स्थळे’ कळली त्र पर्यटक वर्ग शिर्डी बरोबरच इतर १३ ठिकाणी जाईल.

     परिणामी तेथील अर्थकारणाला चालना मिळेल. परिणामी तालुक्याचा आर्थिक स्तर पर्यटनाने उंचावेल. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनाला वाव मिळून तालुक्याला वेगळी ओळख निर्माण होईल.

     परंतु यासाठी गरज आहे. शासकीय प्रयत्नांची शासनाने या तालुक्यातील १३ तीर्थक्षेत्रांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करवून तेथे पर्यटक कसे आकर्षित होतील याकडे लक्ष देऊन स्थानिकांच्या मदतीने विकास करणे गरजेचे आहे.

253
वेळा हा लेख वाचला गेला.
Facebook Comments
4.89 avg. rating (97% score) - 9 votes