Login

Register

Login

Register

पत्रकार. साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण.

पत्रकार साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण हे अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील कोल्हार गावी राहतात. त्यांनी इतिहास विषयात एम ए. केले असून एम.फिल करत आहेत. ते शिवचरित्र अभ्यासक तसेच दुर्ग अभ्यासक आहेत व शिवचरित्र व्याख्याता देखील आहेत .
संपर्क:- 9011890279

शिवकालीन गणराय

कसबा गणपती

चिंचवडकर गणपती

मोरेश्वर गणपती

श्री.छत्रपती शिवाजी महाराज.

    

  छत्रपती शिवाजी महाराजांची श्री गणेशा वर फार अतूट श्रद्धा होती.शिवरायांना गणेश भक्तीचा वारसा जिजाऊ मां साहेबांकडून लाभला होता. श्री छत्रपती शिवराय संकष्ट चतुर्थीचा उपवास करीत असत.शिवरायांनी चिंचवडकर नारायण महाराज गोसावी यांजकरवी श्री गणेश मंत्राचा अनुग्रह घेतला होता. रघुनाथ पंडितांच्या राज्यव्यवहर कोश्याच्या प्रस्तावनेत तसा स्पष्ट उलेख आहे.

     शिवरायांच्या स्वराज निर्मिती नंतर प्रकटण्याची हीच योग्य वेळ साधून असंख्य देवता भूमीतून वर येत गेल्या. जी स्थळे आडवाटाला दुर्लक्षित राहिले होती त्यावर दिमाखदार भगवा ध्वज लहरू लागला  उदाहरणे असंख देता येतील. शिवरायांनी जागोजागच्या मंदिरांना वतने दिली. देवस्थानांच्या रक्षणाच्या दृष्टीने त्यांनी वेगळीच दूरदृष्टी आखली.

     कोणत्याही आक्रमणाच्या काळात आपल्या सैन्याचा तळ महत्वपूर्ण देवस्थानच्या दूर वर ठेवत असत प्रसंगी शिवराय ताज्या दमाची मंडळी देवस्थानांच्या रक्षणासाठी देत असत.

     पन तो सैन्याचा जमाव नसायचा आक्रमण यवन असेल तर हिंदू धर्म स्थळे त्यांच्या निश्याण्यावर असायची पण समोरच्या सैन्यावर दुर्लक्ष हि करता येत नसे. धर्मस्थळे डाव्या-उजव्या बगलेकडे राखून उभे राहिले कि आक्रमकांना ती वगळूनच हालचाल करावी लागल असे. या यासंदर्भात चिंचवडकर श्री गणेश देवस्थानच्या अनुषंगाने श्री छत्रपती शिवरायांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. मराठा सैन्याला सबुरीचा सल्ला देताना शिवराय म्हणतात कि “ देवस्थानापासून दूर मुक्काम राखावा.”

     स्वराज्यात एकदा धान्याची महागाई आली. महागाई होताच शिवरायांनी आपल्या अधिकाऱ्यांना पत्रे पाठवली. “ श्री ना स्वस्त नेहमीच्या किमतीत धान्य द्यावे त्यामुळे जे नुकसान होईन ते सरकारातून जमा केले जाईन साहेब (छत्रपती) भरतील.” यातून शिवरायांचे धर्मप्रेम व अतूट श्रद्धा दिसून येते.

     शिवकालीन गणरायांची माहिती हि पुढीलप्रमाणे १} कसबा गणपती:- जिजामाता व शहाजी राजे यांच्या मदतीने ई.स. १६६६ मध्ये समारंभ पूर्वक गजाननाच्या मूर्तीची स्थापना झाली. त्यांनी या मंदिराचा दगडी गाभारा बांधून दिला. हि पुण्याची ग्रामदैवत आहे. शिवाजी महाराजांच्या वाड्याला लागुनच हे मंदिर असल्यामुळे स्वतः शिवराय व त्यांच्या घराण्यातील मंडळी येथे दर्शनास येत असत. २} चिंचवड देवस्थान:- शिवरायांनी उत्सवाच्या खर्चासाठी जमिनी दिल्या. ३} पुळ्याचा गणपती:- हे मंदिर समुद्र किनाऱ्यावर असून तीनशे फुट उंचीच्या हिरव्यागार टेकडीच्या पायथ्याशी आहे. देवळाचा गाभारा शिवरायांचे प्रधान अण्णाजी दत्तो यांनी बांधला शिवाजीराजे, माधवराव पेशवे,सांगली संस्थानचे संस्थापक हरभट पटवर्धन इत्यादी थोर पुरुषांनी या मूर्तीची उपासना केली आहे.

      असो श्री शिवरायांचे गणेश सेवेचे संदर्भ आहेतच मोरगाव क्षेत्राच्या दुरुस्तीचे संदर्भ हि शिव सरदारांबाबत सांगितले जातात. ४} भोरजवळ आंबवडे येथे व ५} वरंध घाटाजवळील गावात छत्रपती शिवाजी महाराजांनी गणेशाची स्थापना केली. सुरतेच छापा यशस्वी करून परतताना शिवराय हे नंदुबारच्या दंडपाणी गणेश, चांदवड जवळचा गणेश बारीचा गणपती या स्थानावर मुक्कामास होते. सन १६७४ ला शिवरायांच्या रायगडावर राज्याभिषेक झाला. त्याच्या निर्विह्न्तेसाठी समर्थ रामदास स्वामीनी शिवथर घळीमध्ये पार्थिव गणेश मूर्तीचे पूजन करून एक प्रकारे सार्वजनिक गणेश उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.

     शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारण्याआधी किनाऱ्यावर श्री गणेश पूजन करून धर्मव्यवस्थेला सूरक्षितेची हमी दिली. चिंचवडकर देवस्थाने टर राजाश्रयाच्या बळावर चिंचवड, मोरगाव, थेऊर, ओझर, सिद्धटेक येथील श्री गणेश देवस्थानाचे जीर्णोद्धार केले.

0
Peoples Read This
Facebook Comments
5.00 avg. rating (99% score) - 6 votes
  • Sign up
Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.
We do not share your personal details with anyone.