Login

Register

Login

Register

इतिहासातील सुवर्णक्षण: शिवराज्याभिषेक सोहळा

        महाराष्ट्राच्या इतिहासातील परमोच्च आनंदाचा सुवर्णक्षण अठरापगड जातीच्या बलिदानातून मराठी तख्ताची जागा अद्वितीय अशा रायगडावर साकारली

रायगड………. राज्याभिषेकाची घटना अनेक शतकानंतर साकारली रायगडाच्या अंगाखांद्यावर रायगड किल्ल्यावर झालेला शिवराज्याभिषेक उत्सव हा 346 वर्षांपूर्वी घडलेला आहे

हा सोहळा इतका तो त्या काळी भव्यदिव्य सोहळा झाला की या सोहळ्याचे वर्णन करावे तितके थोडेच असा हा अनुपम सोहळा पाहण्याचे भाग्य लाभलेला मराठी बखरकार कृष्णाजी अनंत सभासद या सोहळ्याचे वर्णन दोनच वाक्यात करतो सभासद म्हणतो की, या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशाह मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही खरोखरच असामान्य गोष्ट होती .

कारण त्या काळात स्वतंत्र सार्वभौम हिंदू तक्ता ची कल्पना सुचावी व ती अमलात आणून दाखवावी ही गोष्ट अचंबा  वाटावा अशीच होती सन १६७४ साली हिंदवी स्वराज्याचा मेरूमणी असलेल्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून युगानुयुगे गर्व करावा अशी ही असाधारण गोष्ट घडवून आणली या सोहळ्यासाठी ब्राह्मण मंडळी व या सोहळ्याचे पौराहित्य करण्यासाठी काशी तीर्था वरून गागा भट्ट आले .

गागाभट्ट यांचे घराणे मूळचे पैठणचे पण काशीमध्ये स्थायिक झालेले हिंदू धर्मशास्त्र व तत्वज्ञानात त्यांच्या तोडीचा अन्य कोणी पंडित हिंदुस्थानात नव्हता अशा महान पंडिताला छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचे पौराहित्य दिले होते राज्याभिषेक अगोदर 29 मे १६७४ शिवरायांची सुवर्णतुला व मौजीबंधन समारंभ पार पडला 30 मे रोजी वैदिक पद्धतीने विवाह लावण्यात आला आणि तीस तारखे नंतर ते पाच जून पर्यंत रोज अनेक प्रकारचे विधी होम हवन दान ब्राह्मण भोजने इत्यादी व असे अनेक कार्यक्रम नित्य चालू होते.

जून चा दिवस उजाडला अशा स्वर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो लोक ह्या दिवशी रायगडावर दाखल झाले होते आणि आनंद नाम संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध 13 शके १५९६ शनिवार दिनांक सहा जून १६७४ उष :काली पाच वाजता महाराज शिवाजीराजे रायगडावर छत्रपती होऊन सिंहासनाधीश्वर झाले आणि हजारो मुखातून एकच गर्जना उठली छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्यातील किल्ल्यांवरून ,वाड्यावरून ,जलदुर्ग वरून आणि आरमारी गलबतांवर वरून तोफांचा दनदनाड झाला

सर्व सह्याद्रीत एकच जल्लोष व जय जयकार कानी पडू लागला सर्व महाराष्ट्र आनंदून गेला

देवगिरी वारंगल, द्वारसमुद्र, कर्णावती ,विजयनगर आणि प्रत्यक्ष इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली येथे परकीय आक्रमक व कालौघात नष्ट झालेली हिंदू सिंहासने  रायगडावर या समारंभाने पुन्हा सांधली या घटनेनंतर रायगड हा केवळ राजधानीचा दुर्ग न राहाता शिवतीर्थ म्हणून ओळखला जाऊ लागला .

या अपूर्व सोहळ्याने व छत्रपती शिवरायांच्या जल्लोषाने दिल्ली पतीस कानठळ्या बसल्या विजापूरची आदिलशाही व कुतुबशाही हादरली इंग्रज फ्रेंच पोर्तुगीज डच या चार जणांना पुरून उरत मराठी राजा छत्रपती झाला याचा निनाद सातासमुद्रापार ऐकू गेला या सोहळ्यास महाराणीचा मान सोयराबाईंना व राजपुत्राचा मान संभाजीराजांना मिळाला राज्याभिषेकावेळी जे सुवर्ण सिंहासन होते ते 32 मण सोन्याचे होते त्यासाठी सोन्याचे 50 होण एवढा खर्च झाला शिवाजी महाराजांनी ह्या सोहळ्यात अपार दानधर्म केला चोवीस हजार होण तर दक्षिना यासाठीच खर्च झाले गागाभट्टांना सात हजार  दक्षिणा देण्यात आली.

७जून १६७४ रोजी सुरू झालेला दानधर्म पुढे बारा दिवस झाला होता हा राज्याभिषेक समारंभ शुक्रवारी सायंकाळी सुरुवात होऊन तो शनिवारी सकाळी संपला हा सोहळा पूर्ण झाल्यावर प्रत्येक उपस्थित मावळ्याच्या चेहऱ्यावर व मासाहेब जिजाऊ यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद इतका होता की त्याची कल्पनाच करवत नाही.

 कारण आता एक हिंदू तक्त एक स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण झाले होते या समारंभात सभासदाच्या म्हणण्याप्रमाणे एक करोड बेचाळीस लक्ष होण खर्च आला असा हा राज्याभिषेकाचा सोहळा रायगडावर  थाटामाटात व मोठ्या दिमाखात संपन्न झाला .या सोहळ्यापासून छत्रपती शिवरायांनी नवीन शक सुरु केले या सोहळ्यापासून शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ कार्यान्वित झाले ज्याला जी जबाबदारी सोपवली असेल तो ती प्रामाणिक पार पाडू लागला छत्रपती शिवरायांनी राज्यव्यवहार कोश ग्रंथ वे .शा .सं .रघुनाथ नारायण अध्वरी पंडितराव यांचेकडून करून घेतला होता व मुख्य म्हणजे ज्या अर्थकारणावर जग चालतं ती चलनी नाणी उर्फ मुद्राही जगापुढे आली.

 तांब्याची शिवराइ जिच्यावर ‘’श्री राजा शिव छत्रपती’’ अशी अक्षरे कोरलेली आहे व सोन्याचा होण ही अस्सल मराठमोळी नाणी व्यवहारात आली हा सोहळा पाहण्यास इंग्रज अधिकारी जो वकील होता थोमस निकल्स तो हा सोहळा पाहून अचंबित झाला असा हा युगानुयुगे गर्व करावा व स्मरणात राहावा असा हा दिमाखदार सोहळा इतिहासातील खरोखरच ‘’एक अपूर्व सोहळा ‘’ आहे .

साईप्रसाद कुंभकर्ण.

संपर्क :- 9011890279

Facebook Comments
5.00 avg. rating (98% score) - 3 votes