सिद्धविनायक नर्सरी
आमच्याकडे सेंद्री भगवा , आरक्ता जातीचे डाळिंब तसेच लखनऊ ४९ या जातीचे पेरूचे रोप योग्य दरात मिळतील .
डाळिंब –
- सेंद्री भगवा
- आरक्ता
पेरू
- लखनऊ ४९
संपर्क – निलेश गोर्डे ९८३४८२८६२२ / ८६००४६६०३१
पत्ता – मु/पो – अस्तगाव , तालुका राहाता , जिल्हा – अहमदनगर ४२३१०७
डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. दाडिमाष्टक, दाडिमादि चूर्ण, दाडिमाद्य तेल आदी औषधीत डाळिंबाचा वापर होतो. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात[ संदर्भ हवा ]. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.[ संदर्भ हवा ] हृदयातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवण्याचे काम डाळिंबामधील औषधी गुण पार पाडतात. डाळींब खाणाऱ्यांची त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. शेंदूर खाल्याने बिघडलेला स्वर, रोज डाळिंब खाल्ल्यास स्वर सुधारण्यास मदत होते. 20 ग्रँम डाळींबरस व 10ग्रम खडीसाखर घालून दिल्याने कावीळ बरी हाेते.
महाराष्ट्रातील जाती[संपादन]
- गणेश – बिया मऊ, चव गोड.
- जी – १३७ – दाणे मऊ.
- मृदुला – फळे आकाराने मध्यम
- आरक्ता – गोड, टपोरे, आकर्षक दाणे, चमकदार साल, गडद लाल रंग.
- भगवा – उत्तम चव
रोग[संपादन]
बागेतल्या डाळिंबांना तेलकट डाग रोगाचा विकार होऊ शकतो. डाळिंबाच्या खोडास लहान छिद्रे पाडणार्या भुंगेर्यांमुळे (शॉट होल बोररमुळे) मुख्य खोडावर आणि मुळावर लहान-लहान छिद्रे दिसतात.
डाळिंबाच्या झाडाला खोडकिडीचा प्रादुर्भाव झाल्यावर एखादी फांदी किंवा पूर्ण झाड वाळते.
शॉट होल बोररच्या नियंत्रणासाठी गेरू ४०० ग्रॅम + लिंडेन २० टक्के प्रवाही २.५ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५ मिली + ब्लायटॉक्स २.५ ग्रॅम प्रती लिटर या प्रमाणात मिश्रण तयार करून त्याचा खोडास मुलामा देतात.. तसेच लिंडेन किंवा क्लोरोपायरीफॉस + ब्लायटॉक्स वरीलप्रमाणे घेऊन .प्रती झाड ५ लिटर द्रावण खोडाशेजारी मुळांवर ओततात.
खोडकिडा नियंत्रणासाठी फेनव्हलरेट ५ मिली किंवा डायक्लोरव्हॉस १० मिली प्रती लिटर या प्रमाणात इंजेक्शनद्वारे छिद्रात सोडून छिद्रे चिखलाने बंद करतात..
डाळींब पिकावरील किडी[संपादन]
- फळ पोखरणारी माशी
- तुडतुडे
लागवड[संपादन]
डाळिंबाची लागवड कलम लावून करता येते. अशी लागवड अफगाणिस्तान, अमेरिका, इजिप्त, इस्राईल, चीन, जपान, पाकिस्तान, ब्रह्मदेश, रशिया, स्पेन, आणि भारत या देशांमध्ये करतात. डाळिंबाच्या झाडांना उष्ण, दीर्घ उन्हाळा, कोरडी हवा व साधारण हिवाळा अधिक मानवतो.
महाराष्ट्र[संपादन]
भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन प्रमाण यांत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार व राहुरी हा भाग तर नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात डाळिंबाची लागवड होते. भगव्या जातीच्या डाळिंबाला बाजारपेठेत मागणी असते.
यवतमाळ येथेही वृक्षवल्ली डाळिंब उत्पादन प्रकल्प, मुकुटबन, तांभेरे असे प्रकल्प झाले आहेत. पिंपरी निर्मळ जिल्हा नगर येथेही प्रकल्प आहेत. तालुका निहाय विचार केल्यास पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे जवळपास पंचवीस हजार एकरच्या आसपास डाळिंब लागवड झालेली आहे .
निर्यात[संपादन]
नाशिक येथून डाळिंबांची निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लासलगाव येथील विकिरण केंद्रात डाळिंबावर विकिरण प्रक्रियाही सुरू झाली आहे.
REF-सदर माहिती ही विकिपीडिया या संकेतस्थळावरून घेतलेली .
SHARE IT WITH YOUR FRIENDS :-
- Click to share on WhatsApp (Opens in new window)
- Click to share on Facebook (Opens in new window)
- Click to share on Twitter (Opens in new window)
- Click to share on Telegram (Opens in new window)
- More
- Click to print (Opens in new window)
- Click to share on LinkedIn (Opens in new window)
- Click to share on Reddit (Opens in new window)
- Click to share on Tumblr (Opens in new window)
- Click to share on Pinterest (Opens in new window)
- Click to share on Pocket (Opens in new window)
- Click to share on Skype (Opens in new window)
- Click to email this to a friend (Opens in new window)